इन्सुली काजू फॅक्टरी चोरी प्रकरण | १२ तासात आरोपीच्या आवळल्या मुसक्या

Edited by:
Published on: August 28, 2023 15:22 PM
views 2655  views

सावंतवाडी :  इन्सुली खामदेव नाका येथील शिवदुर्ग कॅश्यु फॅक्टरी अज्ञात चोरट्याने ४८ हजार रुपयांची रोकड व ८ हजार रुपयांचा मोबाईल लंपास केला होता. याबाबतची फिर्याद मालक दिगंबर सदाशिव बोंद्रे यांनी बांदा पोलीसात दाखल केली होती.

या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत १२ तासांच्या आत आरोपीला गजाआड केलं. सावंतवाडी येथून संशयित आरोपी कन्हैया मनोरंजन गिरी मूळ राहणार बिहार याला गाडी आणि अन्य सामानासह अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीचा आणि अन्य घरफोड्यांचा काही सबंध आहे का याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.