
सिंधुदुर्गनगरी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व रस्ते नीटनेटके राहतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. गेले दोन-तीन दिवस अतिवृष्टी झाल्याने रस्त्यांवरील खड्डे बुजवणे अशक्य होते. मात्र आता पावसाचा जोर कमी झाला असून, पंचवीस तारीख पर्यंत जिल्ह्यातील सर्व रस्ते खड्डे मुक्त व्हावेत यासाठी प्रयत्न करा. हा आपला पावसाळी जिल्हा आहे. त्यामुळे सर्व शंभर टक्के रस्ते व्यवस्थित होतील असे नाहीत परंतु खड्डे राहणार नाहीत आणि जनतेला प्रवासामध्ये अडथळा निर्माण होणार नाही. याची सर्वांनी काळजी घ्या असे सांगतानाच महामार्गावर असलेली स्थिती तात्काळ सुधरा सर्विस रोड खड्डे मय झालेले आहेत. तेही खड्डे मुक्त करून लोकांचा प्रवास सुखकर होईल यासाठी प्रयत्न करा अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिले. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या स्थितीबाबत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नितेश राणे यांनी आज जिल्ह्यातील रस्त्या संदर्भातील सर्व विभागांची बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.