सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची बदली

Edited by: विनायक गांवस
Published on: February 06, 2024 05:22 AM
views 337  views

सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली आहे. याबाबतचे आदेश त्यांना सोमवारी उशिरा प्राप्त झाले.

अद्यापपर्यंत या ठिकाणी कोणताही अधिकारी देण्यात आलेला नाही. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे सहा महिन्यांपूर्वी सावंतवाडी पोलीस ठाण्यात रुजू झाले होते. तत्पूर्वी ते दोडामार्ग येथे निरीक्षक म्हणून कार्यरत होते. ऋषिकेश अधिकारी यांच्या नियुक्तीनंतर पोलिस निरीक्षकांच्या संगीत खुर्चीचा खेळ काहीकाळ थांबला होता.