
सिंधुदुर्ग : रस्ता सुरक्षा अभियान २०२४ अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग मार्फत काचेवर काळी फिल्म लावणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. हायवेवर कणकवली, कुडाळ व सावंतवाडी येथेही तपासणी करण्यात आली. यावेळी एकूण २५ वाहनचालकांची तपासणी केली तसेच ऑनलाइन ०७ चलन देण्यात आले. त्यामध्ये ब्लॅक फिल्म, सिटबेल्ट, पीयूसी, इन्शुरन्स, इत्यादी ऑनलाइन चलन देण्यात आले.
तसेच डेंजरस ड्रायव्हिंग व लेन डिसिप्लिन्, वाहन चालवताना घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी मोटर वाहन निरीक्षक रत्नाकांत ढोबळे आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अरुण पाटील, सिद्धार्थ ओवाळ, अमित पाटील - हिले उपस्थित होते.










