आगार व्यवस्थापकांची चौकशी करा ; मनसेची मागणी

मनसेची मागणी
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 06, 2022 20:49 PM
views 231  views

मालवण : मालवण येथे झालेल्या एसटी -डंपर यांच्यातील अपघाताची चौकशी होण्याबाबत मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार केली असुन मालवण आगार व्यवस्थापकांची गांभीर्याने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी इब्रामपूरकर यांनी केली आहे. 


इब्रामपूरकर यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मालवण येथे दिनांक 1 ऑक्टोबर रोजी आनंदव्हाळ येथे रात्री 8.15 च्या सुमारास एसटी -डंपर यांच्यात अपघात झाला होता. या एसटी बसचा नंबर एमएच-20 बीएल 1659 असा असुन या अपघातात एसटीचे जबर नुकसान झाले. याबाबत मालवण पोलीस स्थानकात कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. शासनाच्या नियमावलीमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची रीतसर तक्रार स्थानिक पोलीस स्थानकाला देऊन पंचनामा करून गुन्हा दाखल करावा लागतो. परंतु अशा प्रकारची कोणतीही हालचाल मालवण आगार व्यवस्थापकांनी केली नाही. त्यामुळे सदर प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून  मालवण आगार व्यवस्थापकांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे.