
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील सायन्स शाखा असलेले पूर्वी चे एकमेव विद्यालय म्हणजे कुडासे प्रशाला. अनेक वर्ष या विद्यालया मधून अनेक डॉक्टर इंजिनिअर, उद्योजक, अधिकारी घडून गेलेत. सर्व माजी विद्यार्थी एकत्र येत विद्यालय सुशोभीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्याचे धोरण निश्चित करून सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. यामध्ये विविध वयोगटाच्या माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर याच दिवशी आज पर्यंत सेवा दिलेल्या गुरूवर्य व्यक्तिमत्त्वांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. यामध्ये अनेक शिक्षक माजी विद्यार्थी उपस्थित होते. नवभारत संस्था पदाधिकारी आणि शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
माजी विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नांनी तयार झालेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा गरुडझेप हा ऐतिहासिक नाट्य प्रयोग रात्री सादर झाला. यामध्ये दिग्दर्शक श्री युवराज मंगेशकर यांच्या विविधांगी दिग्दर्शनाने समजलेला हा नाट्यप्रयोग तालुक्यातील आणि गोव्यातील नाट्य प्रेमींच्या खूप पसंतीस उतरला. यामधील दिग्दर्शन, नेपथ्य आणि माजी विद्यार्थी कलाकारांनी केलेला भूमिकाअभिनय संपूर्ण कार्यक्रमाला चार चांद लाऊन गेला. तब्बल पस्तीस माजी विद्यार्थी कलाकारांनी साकारलेला गरुडझेप नाट्यप्रयोगाचे अनेकांनी कौतुक केले आहे. माजी विद्यार्थ्यांनी उभ्या केलेल्या अजरामर ऐतिहासिक नाट्यकृतीला विविध भागातून सादरीकरणासाठी मागणी होत आहे.
प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यानी राबवलेल्या सर्व अभिनव उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.