'इनरव्हिल'कडून विद्यार्थ्यांना फळ झाडे रोप

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 12, 2025 15:22 PM
views 46  views

कुडाळ : सरंबळ इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ व रविशंकर डोकोजू फाऊंडेशन बेंगलोर कडून 110 फळझाडेरोप वितरित करण्यात आली.

यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सानिका मदने,पी डी सी डाॅ सायली प्रभू, सचिव सई तेली, आयएसओ मेघा भोगटे, शिल्पा बिले, स्वप्नाली साळगावकर, प्रिती तायशेटये, रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष राजीव पवार, असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने, मुख्याध्यापक अनिल होळकर, उपसरपंच सागर परब, माजी विद्यार्थी मंडळ सदस्य मॅक्सी फर्नांडिस, संदिप परब, प्रसाद साटम, संस्था कमिटी अध्यक्ष जयप्रकाश गावडे, शिक्षक वृंद आदी उपस्थित होते.

रविशंकर डोकोजू फाऊंडेशन बेंगलोर चे सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे फळझाडेरोप वितरण व वृक्षारोपण आदर्शवत असल्याचे प्रतिपादन इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सौ सानिका मदने यांनी केले.

इनरव्हील क्लब हि आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था असून विविध क्षेत्रातील महिलांना सामाजिक कार्य करण्याचे हक्काचे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन पी डी सी डाॅ सायली प्रभू यांनी व्यक्त केले.

मुख्याध्यापक अनिल होळकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सहशिक्षक संदिप परब तर आभार सौ होळकर यांनी केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना आयडीयल स्टडी ॲप वितरित करताना रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष राजीव पवार,  असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने, इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सानिका मदने, मुख्याध्यापक अनिल होळकर आदी मान्यवर उपस्थितीत होते.