'इनरव्हील क्वीन'ला पेडणेकर ज्वेलर्सकडून 'सोन्याची नथ' !

'सोन्याची नथ' पेडणेकर ज्वेलर्सचे व्यवस्थापक अजित खैरे यांच्या हस्ते करण्यात आली सुपूर्द
Edited by: विनायक गांवस
Published on: December 26, 2022 12:34 PM
views 431  views

सावंतवाडी : पर्यटननगरी सावंतवाडीतील मनोरंजनाचा तब्बल तीन वर्षांचा बॅकलॉग पहिल्याच प्रयत्नात भरून काढणाऱ्या सावंतवाडी इनरव्हील महोत्सवानं सरत 2022 वर्ष यादगार केलय. तिन्ही दिवस या महोत्सवाला सावंतवाडीकरांचा तुफान प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाच खास आकर्षण असणारी 'इनरव्हील क्वीन'  माधवी शहापुरकर ठरली. या स्पर्धेच्या बक्षिसांच प्रायोजक्त जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे दादा पेडणेकर यांनी स्वीकारल होत. इनरव्हील क्वीनसह द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना सोन्याची नथ पेडणेकर ज्वेलर्स सावंतवाडीकडून देण्यात आली.  ''इनरव्हील क्वीन'' स्पर्धेत ३० ते ५० या वयोगटातील महिला सहभागी झाल्या होत्या. १८ जणींनी यात सहभाग घेतला होता. यात माधवी शहापुरकर हीन मानाचा इनरव्हील किताब पटकविला. तर  कृतिका कोरगांवकर  द्वितीय, सपना विरनोडकर तृतीय तर गौरी बांदेकर, प्रिती सावंत यांनी  उत्तेजनार्थ क्रमांक पटकविला. पल्लवी केसरकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आल. तर  स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना 

जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या माध्यमातून 'सोन्याची नथ' पेडणेकर ज्वेलर्सचे व्यवस्थापक अजित खैरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.