
सावंतवाडी : लाखे वस्तीतील २५ बेघर कुटुंबानी लाखे वस्तीतील शासकीय जागेमध्ये २५ नवीन घर बांधून मिळण्याची मागणी शिक्षण मंत्री दीपक केसकर यांच्याकडे केली होती. याचा पाठपुरावा सावंतवाडी शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांनी केला होता. १५ ऑगस्टला लाखे वस्तीतील समाजाने मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतल्यानंतर सर्व परिस्थिती जाणून त्यांच्या मागणीनुसार लाखे वस्तीतील मोकळ्या जागेतील २५ घरांचा आराखडा तयार करण्याचे आदेश नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना दिले. दिनांक १६ ऑगस्टला सकाळी लाखेवस्तीत जाऊन मुख्याधिकारी, शिवप्रसाद कुडपकर, सावंतवाडी शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांनी लाखे वस्तीमध्ये जाऊन मोकळ्या जागेची पाहणी केली.
त्या मोकळ्या जागेमध्ये २५ नवीन घरे बांधण्यासाठी कशाप्रकारे आराखडा तयार करता येईल या संदर्भाची चर्चा मुख्याधिकाऱ्यांनी लाखे वस्तीतील बेघर कुटुंबांशी केली. त्याचप्रमाणे सदर घरे कोणत्या योजनेत बसतील त्याप्रमाणे सदर २५ घरांचा प्रस्ताव आमच्याकडून लवकरात लवकर तयार करून तुम्हाला काही दिवसात कळवणार असल्याचे मुख्याधिकारी साळुंखे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे लाखे वस्तीतील समस्या सोडवण्याची विनंती केली.
मंत्री केसरकर यांनी बेघर कुटुंबीयांना नवीन २५ घरे बांधून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर लाखे वस्तीतील कुटुंबीयांनी मंत्री दीपक केसकर यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे सतत पाठपुरवठा करणारे शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांचेही आभार मानले.
यावेळी श्रीरासाई मंडळाचे अध्यक्ष कृष्णा लाखे, सागर लाखे, नितेश पाटील, अंकुश लाखे, विकी लाखे, साई लाखे, राम लाखे, रोहन लाखे, रोहन पाटील, शुभम लाखे, अविनाश पाटील, गोपी पाटील, मनोज लाखे, मनोज पाटील, राजू खोरागडे, साई खोरागडे, मनोज लाखे, रघुनाथ लाखे, लाखे वस्तीमधील महिला उपस्थित होत्या.