
चिपळूण (प्रतिनिधी) : “प्रशांत यादव यांच्या वाशिष्ठी डेअरीतील प्रॉडक्ट मी चाखले आहेत. प्रशांत यादव हे राजकीय प्रॉडक्ट म्हणून कसे आहेत, हेही मला माहित आहे. रमेशभाई कदम यांच्याकडे कैरीचे पन्ह चांगले मिळतं, त्यामुळे मी त्यांच्याकडे पन्ह प्यायला अधूनमधून जातो. भास्करराव जाधव शेती करतात. पुढच्या वर्षी भातलावणीसाठी मी त्यांच्याकडे नक्कीच जाईन,” अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी चिपळूणमधील राजकीय घडामोडींवर सूचक भाष्य केले.
शनिवारी चिपळूण शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या चिपळूण तालुक्यात आणि शहरात शिवसेनेतील राजकीय हालचालींनी वेग घेतलेला असताना, या पार्श्वभूमीवर मंत्र्यांचे हे भाष्य महत्त्वाचे मानले जात आहे.