उद्योग मंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: April 26, 2024 11:06 AM
views 121  views

राजापूर : राजापुरात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फसडणवीस यांच्या उपास्थितीत सभा सुरु आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली. राज्यातील उद्योग परराज्यात जाण्यास उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप उदय सामंत यांनी केला. 

सामंत म्हणाले, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी अनेक विकासकामे ही कोकणात केली आहेत. सिंधुदुर्ग विमानतळावरून विमानाने टेकऑफ घेतले आहे. पुढच्या वर्षी रत्नागिरी विमानतळावरून विमान टेक ऑफ घेईल. ही निवडणूक आपल्या सर्वांची आहे. केंद्र व राज्य सरकारने अनेक विकासकामे केली आहेत. विरोधी उमेदवाराकडे सांगण्यासारखे काहीही नाही. आघाडी सरकार असताना त्यांनी जे उद्योग बाहेर घालवले. ते आणण्याचे काम आम्ही केले. परराज्यात गेलेले उद्योग हे उद्धव ठाकरेंचे पाप आहे. हुंडाईचा प्रकल्प आणण्यासाठी दक्षिण कोरियाला गेलो होतो. मागच्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्योग आणण्याबाबत काहीच काम नाही केल. विरोधकांकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने जनतेने पाठीशी राहावे. आज गावागावात महायुतीचा प्रचार जोरात सुरु आहे. मोठ्या मताधिक्याने नारायण राणे निवडून येतील असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.