महाराष्ट्र - गोव्यातील मॅरेथॉनमध्ये सिंधू रनरचा सहभाग

Edited by:
Published on: December 14, 2023 18:02 PM
views 81  views

सावंतवाडी : महाराष्ट्र आणि गोवा मध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये सिंधू रनर टीमच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला. गोवा येथे झालेल्या एसकेएफ गोवा रिव्हर मेरेथॉन या स्पर्धेमध्ये बारा खेळाडू सहभागी झाले होते. गोवा रिव्हर मॅरेथॉन ही गोव्यामध्ये होणारी आणि अथलेतिक असोसिएशन ऑफ इंडिया मान्यता प्राप्त पूर्ण मॅरेथॉन आहे यामध्ये 42, 21, दहा आणि पाच किलोमीटर या प्रकारात तब्बल बारा खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

गोवा चिखली ग्रामपंचायत ते झूवारी रिवर असा मॅरेथॉनचा मार्ग होता. जगभरातून जवळपास दोन ते तीन हजार खेळाडू सहभागी झाले होते. नॅशनल जॉग्रफि ट्रॅव्हलर अवॉर्ड मिळालेल्या या मॅरेथॉनमध्ये सिंधु रनर टीमच्या धावकांनी आपली वेगळी छाप सोडली. डॉ. उमेश सावंत यांनी 4 तास 40 मिनिटे, भूषण पराडकर आणि विनायक पाटील यांनी 5 तासात, डॉ. प्रशांत मडव यांनी 5 तास 20 मिनिटे, अभिजीत पाटील यांनी 5 तास 40 मिनिटे आणि अविनाश नार्वेकर यांनी 5 तास 43 मिनिटे या वेळेत फुल मॅरेथॉन (४२.१९५ किलोमीटर्स) पूर्ण केली. डॉ. अनुज यांनी 4 तास 16 मिनिटे आणि डॉ. राहुल वझे यांनी 4 तास 33 मिनिटे या वेळेत ३२ किलोमीटर्स अंतर पूर्ण केले. तसेच डॉ. संचित खटावकर यांनी 2 तास 15 मिनिटे, डॉ. प्रशांत सामंत यांनी 2 तास 51 मिनिटे आणि रवी बुरुड यांनी २ तास ५६ मिनिटे या वेळेत हाल्फ मॅरेथॉन (२१.१०० किलोमीटर्स) पूर्ण केली.

मुंबईमध्ये झालेल्या वसई -विरार या जगप्रसिद्ध मॅरेथॉनमध्ये सिंधू रनर टीमच्या पाच धावांनी सहभाग नोंदवला. यामध्ये प्रसाद कोरगावकर याने तब्बल 3 तास आणि 5 मिनिटात फुल मॅरेथॉन पूर्ण करून आपले नाव विजयी धावकांच्या यादीत ८ व्या स्थानावर नोंदवले, नरेश मांडवकर याने 3 तास 22 मिनिटात, ओंकार पराडकर याने 4 तासात, महादेव बान्देलकर याने 4 तास 06 मिनिटात आणि निलेश राहणे याने 5 तासात फुल मॅरेथॉन (४२.१९५ किलोमीटर्स) अंतर पार केले.

सावंतवाडी येथे झालेल्या सैनिक मॅरेथॉनमध्ये सिंधू रनर टीमच्या या सहा धावपटूंनी सहभाग नोंदवला, फ्रैंकी गोम्स याने 1 तास 23 मिनिटात, मेघराज कोकरे याने 1 तास 28 मिनिटात हाल्फ मॅरेथॉन (२१.१०० किलोमीटर्स) पूर्ण केली, तसेच रसिका परब हिने ५४ मिनिटात, नम्रता कोकरे हिने ५५ मिनिटात आणि सोनाली पाटील हिने १ तास 10 मिनिटात 11 किलोमीटर अंतर पूर्ण केले. निशांत पाटील याने ३० मिनिटात ५ किलोमीटर अंतर पूर्ण करून टीमचे नाव उंचावले.

अथक प्रयत्न करून सिंधू रनर टीमला नामवंत इंटरनॅशनल धावकांच्या यादीत आपले नाव करता आले याचा सिंधू रानर्स टीमला अभिमान आहे. कोकण सारखया कमी साधने, कमी मार्गदर्शन आणि धावणे या खेळा कडे दुर्लक्षित भागात स्वतःच्या जिद्दीने, प्रतिकूल परिस्थिती कष्ट करून त्याने हे यश संपादन केले. या पुढे त्याला योग्य मार्गदर्शक मिळवून, उत्तम ट्रेनिंग देऊन देशाचे प्रतिनिधित्व कसे करता येईल या साठी सिंधू रनर्स टीम प्रयत्नशील राहील. सिंधू रनर टीम ने आता पर्यंत सावंतवाडी १२ तास रन ३ वेळेस, गोवा ते सावंतवाडी १०० किलोमीटर रन २ वेळेस, २४ तास स्टेडियम रन, हिमालयन खारडूंगला अल्ट्रा रन ७२ किलोमीटर, देहू ते पंढरपूर २६६ किलोमीटर, टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, पुणे अल्ट्रा मॅरेथॉन, जम्पिंग गोरिला ट्रेल रन, लोकमत मॅरेथॉन, ठाणे हाफ मॅरेथॉन अश्या आणि अनेक रन मध्ये भाग घेऊन आपल्या जिल्याह्याचे नाव जगभरात गाजवले आहे.