सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान बॉम्बे ब्लड ग्रुप शोध मोहीम

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 23, 2023 18:06 PM
views 50  views

देवगड : सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगड आयोजित बॉम्बे ब्लड ग्रुप शोध मोहीम (फक्त ओ +Ve / ओ -Ve रक्तगटाकरिता) दिनांक २९ ऑक्टोबर २०२ वेळ : स.९.०० पासून श्री मो गोगटे हायस्कूल,जामसंडे या ठिकाणी राबविण्यात येणार आहे. रक्तदान क्षेत्रात आपल्या रक्तदानाचं अनन्य साधारण महत्व आहे.

तसेच आपणास हेही माहित असेल की बॉम्बे ब्लड ग्रुप नावाचा अत्यंत दुर्मिळ रक्तगट अस्तित्वात आहे. बॉम्बे ब्लड ग्रुप हा रक्तगट जगाच्या लोकसंख्येपैकी दहा लाखात चार या प्रमाणात (०.०००४) उपलब्ध असतो. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात हा रक्तगट मोठ्या प्रमाणात आढळला आहे. मालवण तालुक्यात राबवलेली शोध मोहीम आणि नंतर मिळालेल्या साखळीनुसार या गटाचे तीन रक्तदात्यांसह एकूण सहा व्यक्ती आपल्याला सापडल्या आहेत.तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल 18 लोकांची नोंद आजमितीस आपल्या प्रतिष्ठान कडे झालेली आहे ‌. मालवण तालुक्याप्रमाणे बॉम्बे ब्लड ग्रुप या दुर्मिळ गटाची व्यक्ती आपल्या देवगड तालुक्यातही सापडू शकते. देवगड तालुक्यात अशी विशेष शोध मोहीम करण्याचे प्रयोजन येत्या २९ ऑक्टोंबर रोजी जामसंडे येथे करण्यात आले आहे. देवगड अथवा अन्य कोणत्याही भागातील ओ पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तीने अशी विशेष तपासणी करून घ्यावयाची आहे.

कारण बॉम्बे ब्लड ग्रुप हा रक्तगट ओ गटातच सिद्ध होतो. म्हणूनच आपला गट दुर्मिळ रक्तगट आहे की नाही हे कळण्यासाठी ओ रक्तगटातील जास्तीत जास्त जास्तीत जास्त जणांनी या तपासणीचा लाभ घ्यावा. या विशेष तपासणी चे फायदे.. १) तुम्ही जागतिक दर्जाचे रक्तदाते आहात असे सिद्ध होऊ शकते ‌ २) यदा कदाचित आपला रक्तगट दुर्मिळ असेल आणि भविष्यात आपणासच या रक्तगटाची गरज भासली तर धावपळ होणार नाही. ३) आपण जगाच्या 800 कोटी लोकसंख्येपैकी विशेष चारशे लोकांपैकी एक असू शकतो. ४) आपल्या रक्तगट दुर्मिळ रक्तगट आहे की नाही याची १०० % खात्री होईल. बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तगट शोध मोहिमेत ओ रक्तगटाच्या स्त्री पुरुष सह (रक्तदाता असो वा नसो) सर्वांनी सहभागी होऊन ही विशेष शोध मोहीम यशस्वी करावी. ही विशेष तपासणी संपूर्णपणे विनामूल्य आहे. तरी सर्व रक्तदात्यांनी सहकार्य करावे असे आवाहन. हिराचंद तानवडे 77688 86811 अध्यक्ष सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगड प्रवीण जोग 9423303655 उपाध्यक्ष सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगड प्रकाश जाधव 9096165582 सचिव सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगड माहिती व संपर्कासाठी पंढरीनाथ आचरेकर 9307158286 रविकांत चांदोसकर 9422596990 विजय जोशी 9405851750 उद्धव गोरे 7350704789 महेश शिरोडकर 9922399452 सुधीर तांबे 9420307744 प्रवीण सावंत 9764865789 प्रसाद दुखंडे 9403561196 भावेश पटेल 9423303799 जयदीप तीर्लोटकर 8788286156 दयानंद तेली 9423833081