LIVE UPDATES

दोडामार्ग प्रसुतीगृहातील महिलांना इंडक्शन - थर्मास भेट

विक्रांत सावंत यांच्या वाढदिवसाचं निमित्त
Edited by: लवू परब
Published on: May 28, 2026 16:22 PM
views 49  views

दोडामार्ग : युवा नेतृत्व तथा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे सदस्य विक्रांत विकास सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग येथील प्रसुतीगृहातील महिलांना इंडक्शन, पाणी तापविण्यासाठीचे भांडे व दहा लीटर पाणी राहण्यासाठी थर्मास भेट देण्यात आले.

     विक्रांत सावंत यांचा वाढदिवस दोडामार्गात वेगळ्या उत्साहत साजरा करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे, नगरसेवक रामचंद्र ठाकूर, दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक संजय पाटील व शिक्षक कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी या सर्वांच्या  हस्ते ग्रामीण रुग्णालय दोडामार्गच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे हे सर्व सामान सुपूर्द करण्यात आले ग्रामीण रुग्णालय दोडामार्गचा वैद्यकीय अधिकारी व सर्व स्टाफ तसेच दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.

     विक्रांत विकासभाई सावंत हे शिक्षण, सामाजिक कार्य, युवकांना प्रोत्साहन तसेच ग्रामीण भागातील विविध लोकाभिमुख उपक्रमांमुळे विशेष ओळखले जातात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाशी घट्ट नाळ जोडून ठेवली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

   कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी विक्रांत सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्यासाठी अभिनंदन केले.