LIVE UPDATES

दाभोळेतील १८ वर्षीय युवक बेपत्ता

Edited by: स्वप्नील लोके
Published on: May 28, 2026 20:48 PM
views 19  views

देवगड : देवगड तालुक्यातील दाभोळे राऊतवाडी येथील किरण रवींद्र निकम (१८ वर्षे १० महिने) हा बेपत्ता झाला आहे. याबाबतची फिर्याद त्याची आजी सरिता दशरथ निकम (५५) दाभोळे राऊतवाडी हिने देवगड पोलिसा ठाण्यात दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण निकम हा युवक दिनांक २७ मे रोजी दुपारी १:३० वाजता तळेबाजार येथे जाऊन येतो असे घरात सांगून निघून गेला. तो घरी परत आला नाही. शोध घेऊनही तो सापडला नाही म्हणून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याची आजी सरिता दशरथ निकम यांनी देवगड पोलिसांना दिली आहे. याबाबतचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल गणपती गावडे करत आहेत.