भारतातील पहिल्या फिश थीम पार्क सिंधुदुर्गात

केसरी फणसेवाडीत शानदार शुभारंभ
Edited by: भरत केसरकर
Published on: September 11, 2023 14:35 PM
views 236  views

केसरी : भारतातील पहिलं वहिलं फिश थीम पार्क उभारण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला असून याचा शुभारंभ आज सावंतवाडी तालुक्यातील केसरी फणसवडे येथे करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे वडील दत्तात्रय चव्हाण, आई सौ. शुभांगिनी चव्हाण, पत्नी सौ.सुहासिनी रविंद्र चव्हाण, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

या फिश थीम पार्कमध्ये नागरिकांना देशाविदेशातील विविध प्रकारचे मासे आणि पक्षी पाहायला मिळणार आहेत. सावंतवाडी पासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ग्लोबल ॲक्वेरिअम उभारण्यात आले आहे. याचा फायदा कोकणातील पर्यटन वाढीसाठी होईल असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधूदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी उद्घाटनानंतर विश्वास व्यक्त केला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी फायदा होईल असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे डोंबिवलीतील मित्र, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, अतुल रावराणे, संजू परब, बंड्या सावंत, महेश सारंग, सौ.संध्या तेर्से, अजय गोंदावळे, उद्योजक बंटी पिळणकर, गोव्यातील नामांकित उद्योजक, भाजप व इतर अनेक पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व हितचिंतक उपस्थित होते.