सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये 'भारतीय स्वातंत्र्यदिन' उत्साहात

Edited by: विनायक गावस
Published on: August 15, 2022 12:42 PM
views 174  views

सावंतवाडी : सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये" दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या अंतर्गत ध्वजारोहण ठिक सकाळी ७.३० वाजता सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे सस्थेचे सहसचिव श्री सुलेमान बेग यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. यावेळी सर्व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच काही विद्यार्थी राष्ट्रीय नेत्यांच्या वेशभूषेत उपस्थित होते . तसेच शालेय विद्यार्थिनींनी प्रशालेत सुरेल देशभक्तीपर गीत गायन केले.

या कार्यक्रमांना सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका, पालक - शिक्षक कार्यकारीणी समितीचे सर्व प्रतिनिधी, सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग, विविध सामाजिक स्तरावरील व्यक्ती मोठ्या संख्येने शाळेत उपस्थित होते. या कार्यक्रमाला सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.