
सावंतवाडी : सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये २६ नोव्हेंबर २०२२ रोजी भारतीय संविधान दिन ' उत्साहात साजरा करण्यात आला. या निमीत्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधान दिनाचे महत्व सांगितले आणि भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच प्रशालेत भारतीय संविधानावर आधारीत विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाला सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.