
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदच्या इलेक्ट्रॉनिक गाड्यांची सखोल चौकशी करा तसेच पेमेंट रोखून धरा, अशी मागणी सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. गेल्या काही दिवसापासून नवीन आलेला इलेक्ट्रॉनिक रिक्षा गाड्या काही दिवस बंद अवस्थेमध्ये होत्या. सुमारे तीन लाख रुपये किंमतीच्या पाच गाड्या खरेदी केलेल्या आहेत. या गाड्या सुरुवातीपासूनच वादातील असून याच्यातील एक गाडी अपघातग्रस्त होऊन गॅरेजमध्ये आहे. ही गाडी चालवणे, कर्मचाऱ्यांना वाहतूक करणे धोकादायक झालं असून हे वाहन कधीही एका बाजूला झुकत आहे. भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वाहनांच्या खरेदीबाबत व्यवहाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.