तेलींकडून अपक्ष उमेदवारी दाखल

Edited by: विनायक गांवस
Published on: October 25, 2024 10:26 AM
views 1106  views

सावंतवाडी : महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार राजन तेली यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याबाबत त्यांना विचारलं असता तेली यांनी इन्कार केला आहे. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज देतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहीती राजन तेली यांनी दिली. आज त्यांनी प्रांताधिकारी कार्यालय येथे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे समोर येत आहे. यावेळी उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार आदी उपस्थित होते.