
वेंगुर्ले : तुळस ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये श्री देव जैतीर, सातेरी गाव विकास आदर्श पॅनलला मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. या पॅनलमार्फत सरपंचपदासाठी दिशा मिलिंद शेटकर या सुशिक्षित व जनसंपर्कात असलेल्या उमेदवार रिंगणात आहेत.
या अगोदर ग्रामसंघाच्या माध्यमातून आपण महिलांसाठी गावात भरीव काम केल असून पुढील काळात महिला सक्षमीकरणा सोबतच गावात युवकांसाठी शासनाच्या विविध योजनांतून रोजगार निर्मिती करणार आहे. तसेच गावातील मूलभूत गरजा बाबत प्रश्न सोडवण्या सोबतच उर्वरीत विकासकामांना चालना देण्यासाठी सदैव आपण तत्पर असून तुळस गावातील जनतेने विकासाच्या बाजूने मतदान करून आपल्याला मतरुपी आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन सरपंचपदाच्या उमेदवार दिशा शेटकर यांनी केले आहे.
तुळस गावात शिवसेनेच्या माध्यमातून अनेक विकासात्मक काम मार्गी लागली आहेत. गावात श्री देव जैतीर देवस्थानचे सुसज्ज असे भक्तनिवास आज झालेलं आहे. गावातील महत्वाचे रस्ते सुद्धा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मार्गी लावले आहेत. याच पद्धतीने पाणी पुरवठा तसेच अनेक वैयक्तिक लाभाची विकासकामे या तुळस गावात शिवसेनेच्या माध्यमातून झाली आहेत. याची पोचपावती या निवडणुकीत आपल्याला मिळेल अशी आशा आहे. पुढील काळात अशाच प्रकारे विकासाचा आलेख चढता रहावा यासाठी श्री देव जैतीर, सातेरी गाव विकास आदर्श पॅनलच्या सरपंच उमेदवार दिशा शेटकर यांच्यासाहित सर्व सदस्य उमेदवाराना तुळस गावच्या जनतेने आपले मत रुपी आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी केले आहे.