देवगडमधील पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा वाढता ओघ...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 30, 2024 06:02 AM
views 91  views

देवगड : उन्हाळी सुट्टीचा हंगाम आणि शालेय सुट्यान मुळे देवगड येथील पर्यटनस्थळे पर्यटकांनी बहरली आहेत.येथील पवनचक्की गार्डन सह समुद्रकिनारी पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. तालुक्याच्या विविध भागांत पर्यटकांची उपस्थिती असते, त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला यातून चालना मिळणार आहे. परीक्षा उरकल्याने अनेकांनी देवगड येथे पर्यटनाचा बेत आखल्याचे चित्र आहे. त्यानुसार देवगडसह चालुक्यातील किल्ले विजयदुर्ग आणि श्री क्षेत्र कुण केश्वर येथेही पर्यटकांची वर्दळ वाढू लागली अहे.

पेथील समुद्रकिनारी तसेच पवनचक्की भागात पर्यटकांकडून 'सेल्फी'ची मजा लुटली जात आहे.उन्हाळी सुटीमुळे पर्यटनामध्ये अधिक बहर येणार असला तरी देवगड येथिय समुद्रकिनारा पर्यटकांनी गजबजला आहे. सध्याही पर्यटकांची वर्दळ काही कमी नाही.त्यामुळे स्थानिक हॉटेल व्यावसाय पर्यटकांन मुळे तेजीत सुरू असल्याचे चित्र आहे. मासे, चिकन यासाठी हॉटेलमध्ये मोठी मागणी असते. त्यामुळे स्थानिक पातळीवर मासळीचे दरही वधारले आहेत. खासगी वाहने घेऊन पर्यटक येत असल्याने रह‌दारीतही मोठी वाढ झाली आहे. देवगड येथील समुद्रकिनारी सध्या येथे आंबा हंगाम सुरू असून स्थानिक पातळीवर आंबा खरेदी-विक्री स्टॉल सुरू आहेत.त्यामुळे आपल्या पसंतीचा आंबा खरेदी करण्याबरोवरच स्थानिक पर्यटनाचे दर्शन या दुहेरी हेतूने पर्यटकांची अलिकडे येथे वर्दळ वाढू लागली आहे.

नव्या रस्त्यांचा फायदा रस्त्यांचे जाळे वाढल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. देवगडमधील तारामुंबरी मिठमुंबरी पुल झाल्याने श्री क्षेत्र कुणकेश्वर अंतर कमी झाले आहे. त्यामुळे मिठमुंबरी किनाऱ्यावरही पर्यटक रेंगाळताना दिसतात. एकूणच किनारी भागात पर्यटकांची वाढती संख्या आहे.

व्यवसायवृद्धीस मदत

• पर्यटनातून व्यवसायवृद्धी होण्यास मदत होते. व्यापार व्यवस्थेमधील विविध घटकांना पर्यटनातून आर्थिक लाभ होत असतो. खाडीत सफर करण्याचीही पर्यटकांची हौस असते.तसेच किल्ले विजयदुर्ग समजून घेण्यासाठीही गाईडची आवश्यकता भासते. मे महिना सर्वच बाबतीत व्यवसायवृद्धी करणारा ठरण्याची शक्यता आहे.

'आम्रपर्यटन' संकल्पना अलीकडे वाढीस लागली आहे. बागेतील झाडावरीत आंबा आल्यापासून आंबा पॅकिंग कसे होते याची माहिती पर्यटकांना मिळत असल्याने पर्यटकांची त्यादृष्टीने हौस असो, कृषी पर्यटनाबरोबरच

धार्मिक पर्यटनही बहरत आहे. त्यामुळे पर्यटकांकडून स्थानिक पातळीवरील हॉटेल आरक्षण करण्याच्या दृष्टीनेही चौकशी ही सुरू झाली असल्याचे दिसते. हटे लमध्ये पर्यटकांची वर्दळ जाणवू लागली आहे.

येणाऱ्या पर्यटकांना किनारी भागाचे आकर्षण असते. त्यातच वॉटरस्पोर्ट, स्कुबा डायव्हिंग यालाही पर्यटकांची पसंती असते. पावसाळा सुरू होईपर्यंत किनारी भागात पर्यटकांची वर्दळ राहण्याची शक्यता आहे.