
कुडाळ: ग्रामपंचायतमध्ये आतापर्यंत ६० टक्के मतदान झाले असून हे वाढलेले मतदानाची टक्के सत्ताधाऱ्यांची धोक्याची घंटा आहे. जनतेने उत्स्फूर्तपणे मतदान करण्यास सुरुवात केली असून जनता आता सत्ताधाऱ्यांना कायमस्वरूपी घरी पाठवणार आहे. त्यामुळे ओरोस बुद्रुकमध्ये भाजप पुरस्कृत गाव विकास पॅनलचा विजय निश्चित असल्याचा विश्वास भाजपचे युवा नेते अनंतराज पाटकर यांनी व्यक्त केला आहे.
भाजप युवा नेते भाई उर्फ आनंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रिया वालावलकर यासह भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार काम करत मतदारांपर्यंत आपले विचार पोहचवले आहेत.यामुळे आपलं पॅनल ओरोस मध्ये शिवसेना गटाला दणका देणार असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला आहे. ओरोस मध्ये स स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असून मतदार सत्ताधारी गटात कंटाळले आहेत.सत्ता परिवर्तन अटळ असल्याचा दावा अनंतराज पाटकर यांनी केला आहे. शिवसेनेला लोक आता घरी बसवतील असाही टोला लगावला आहे.सत्ताधारांनी ग्रामपंचायतीकडे लक्ष न देता स्वताचे हीत बघितले. यामुळे मतदार शिवसेनेला धडा शिकवतील.असा दावा भाजपचे अनंतराज पाटकर यांनी केला आहे.