फार्मासिस्ट वेळेत उपस्थित नसल्याने रुग्णांची गैरसोय?

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 13, 2023 19:22 PM
views 117  views

कुडाळ : पणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत फार्मासिस्ट वेळेत उपस्थित राहत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. तरी याबाबत योग्य ती दखल घेऊन रुग्णांची गैरसोय थांबवावी. अशी मागणी डीगस येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

कुडाळ तालुक्यातील पणदूर प्राथमिक आरोग्य केंद्राला डीगस ग्रामस्थांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज अचानक भेट दिली असता येथील कार्यरत फार्मासिष्ठ (औषध निर्माता) हे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नसल्याचे आढळून आले. तेथील फार्मासिस्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित राहत नसल्याबाबत ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आहेत . तरी प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही.

प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माता उपस्थित राहत नसल्याबाबत तक्रारी होत असताना त्यांच्याकडून हे वारंवार घडत आहे. यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत डीगसचे  शिवसेना पदाधिकारी सतीश सुर्वे, रामचंद्र सावंत, रुपेश पवार, भिसाजी पाताडे, आदीसह ग्रामस्थांनी आज जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहेत. तर याबाबत योग्य ती दखल घेऊन रुग्णांची गैरसोय थांबवावी अशी मागणी केली आहे.