प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने 'उत्कृष्ट अधिकारी' म्हणून सन्मानित

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव
Edited by: लवू परब
Published on: August 06, 2025 13:26 PM
views 3287  views

दोडामार्ग : जिल्हाधिकारी कार्यालय महसूल विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 'महसूल सप्ताह' या विशेष उपक्रमाच्या निमित्ताने दोडामार्ग प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

हा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. दोडामार्गचे प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी आपल्या कार्यकाळात महसूल प्रशासनाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांची निवड सत्कारासाठी करण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.