
सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात पार पडले. दोन दिवस चालणाऱ्या या स्नेहसंमेलनात पहिल्या दिवशी प्राथमिक विभागाचे व दुसऱ्या दिवशी माध्यमिक विभागाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संस्थापक व कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, बी.फार्मसी प्राचार्य डॉ.विजय जगताप, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे, स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रियांका डिसोजा आदी मान्यवर उपस्थित होते. पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची थीम 'इन सर्व्हिस वुई युनाईट' अशी असून दुसऱ्या दिवशीची थीम 'हार्मनी ऑफ पंचतत्वा' अशी आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षिका प्रीती डोंगरे यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. नंतर प्री-प्रायमरी व प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा व उत्कृष्ट अदाकारीच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली. डिजिटल स्क्रीन व विद्युत रोषणाईमुळे कार्यक्रम आणखीनच रंगतदार झाला. पहिल्या दिवशी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.