
सावंतवाडी : सावंतवाडी तहसीलदार कार्यालय येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 'आपले एक मत देशाचे भविष्य घडवू शकते, जबाबदार नागरिक बना, मतदान करा असा नारा देत वोटर सेल्फी पॉईंटचे लोकार्पण निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी समीर घारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी श्री. घारे म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार सावंतवाडीत जिल्हा परिषद व पंचायत समिती विभागातील मतदारांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं यासाठी आज सेल्फी पॉईंटच लोकार्पण केलं. तसेच गावागावात जाऊन स्वाक्षरी मोहीम राबवून देखील मतदान जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, निवडणूक नायब तहसीलदार श्रीम. तारी, कर निर्धारक अधिकारी प्राची पाटील, बांदेकर कॉलेजचे तुकाराम मोरजकर आदी उपस्थित होते.










