दारूच्या नशेत बाईकवाल्याची कारला जोरदार धडक

Edited by: विनायक गांवस
Published on: January 24, 2026 16:28 PM
views 365  views

सावंतवाडी : दारूच्या नशेमध्ये असलेल्या सुनील सलामवाडकर (वय 43, रा.चंदगड ) या मोटरसायकल चालकाने रॉंग साईडने येऊन समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. 


डोक्यात हेल्मेट असल्यामुळे सुदैवाने त्याचा जीव वाचला. परंतु, कारचालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी तत्काळ पोलिसांना बोलून घेतले. या अपघातग्रस्त व्यक्तीला प्राथमिक उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.