
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकिय सेवा कार्यक्रम अंतर्गत दोन नविन अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा ठाणे येथे संपन्न झाला. आजपासून दोन्ही नवीन रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व उपजिल्हा रुग्णालय कणकवली याठिकाणी आपत्कालीन रुग्णसेवा देण्यासाठी कार्यरत करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे रूग्ण सेवेत येणारा ताण कमी होणार आहे.
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात दोन नविन अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रूग्णांना या रूग्णवाहीकांचा उपयोग होणार आहे. या लोकार्पण प्रसंगी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, १०८ चे जिल्हा समन्वयक विनायक पाटील आदींसह प्रशासकीय, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकिय सेवा कार्यक्रम या लोकाभिमुख रुग्णहिताच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जाने.२०१४ रोजी सुरु होऊन आज या सेवेला अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत. या सेवेचा जिल्ह्यात शुभारंभ करण्यात आला होता व त्यानंतर ४ टप्प्यांमध्ये ही सेवा संपूर्ण जिल्ह्यात सुरु करण्यात आली. हा उपक्रम पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप या तत्वावरती मे.बी.व्ही.जी. लिमीटेड पूणे या कंपनीमार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ९३७ रुग्णवाहिका असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ३ ए.एल्.एस.व ९- बी.एल्.एस अशा एकूण १२ रुग्णवाहिका आहेत. त्यापैकि जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग, कुडाळ व उपजिल्हा रुग्णालय, कणकवली याठिकाणच्या रुग्णवाहिकांची धावसंख्या ५ लक्ष यावर झालेने त्याजागी नवीन रुग्णवाहिकांची मागणी सातत्याने करण्यात येत होती. ही मागणी शासनाने पूर्ण करुन नवीन दोन ए.एल्.एस्. रुग्णवाहिकांचे आज लोकापर्ण केले. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली व इतर सर्व मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली ठाणे येथे संपन्न झाला.
आजपासून वरील नवीन दोन्ही नवीन रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व उपजिल्हा रुग्णालय कणकवली याठिकाणी आपत्कालीन रुग्णसेवा देण्यासाठी कार्यरत करण्यात आलेल्या आहेत. या योजनेद्वारे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जसे रस्ते अपघात, आग, पूरसदृश परिस्थिती, दंगल, सर्पदंश, अति गंभीर गरोदर माता, नवजात बालक, हार्ट-अॅटक, मेंदूचे आजार, श्वसन विकार, जळीत, अन्न-विषबाधा, अत्यावस्था अशा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत १०८ हा टोल फ्री क्रमांक डायल करून ज्या टिकाणी रुग्णवाहिकेची तातडिची गरज आहे तो पत्ता सांगताच अत्यंत कमी वेळात रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचते. रुग्णवाहिकेत तातडिच्या उपचाराकरिता २४ तास डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध असतात. रुग्णावर योग्य उपचार सुरु करुनच, तात्काळ लागणारी सर्व औषधे, ऑक्सीजन व इतर सुविधा उपलब्ध करुन नजीकच्या रुग्णालयात रुग्णास पोचवावयाचे काम करते. रुग्णास पुढिल उपचाराकरिता एका सरकारी रुग्णालयातून दुस-या सरकारी रुग्णालयात रुग्णास पोचवावयाचे काम करते. विशेष म्हणजे ही संपूर्ण योजना मोफत आहे. रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध करण्यासाठी पुणे येथे स्वयंचलित व अत्याधुनिक संगणक प्रणालीसह एक मध्यवर्ती कॉल सेंटर उभारण्यात आले आहे. संपूर्ण राज्यासाठी १०८ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी २४ तास सुरु ठेवण्यात आलेला आहे.तातडीचा प्रसंग उद्भवल्यानंतर पहिल्या तासात (गोल्डन अवर) वैद्यकिय सेवा मिळाल्यास, रुग्णाच्या जीवाचा धोका कमी होतो. यासाठी शासनाचे आरोग्य सेवेत महत्वकांक्षी पाऊल टाकले आहे. कोणत्याही ठिकाणी तातडीच्या प्रसंगी रुग्णवाहिका उपलब्ध होते व दवाखान्यात पोहचेपर्यंत रुग्णावर तातडीचे उपचार करण्यात येतात. १०८ वर संपर्क साधला असता गोल्डन अवर मध्ये रुग्णांना तातडीची वैद्यकिय सेवा मिळते. १०८ वर संपर्क साधला असता तातडीने रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या सेवेचा अनेक वेळा मोलाचा वापर झाला असून रस्ते अपघात मध्ये आत्तापर्यंत अनेक लोकाना जीवदान मिळाले आहे. २६ जानेवारी २०१४ पासून आजपर्यत १०८- रुग्णवाहिका सेवेचा लाभ रुग्णांनी घेतला आहे.