इन्सुली सावंतटेंब इथं राजन तेलींच्या हस्ते ट्रांसफार्मरचे उद्घाटन...!

Edited by: विनायाक गावस
Published on: June 23, 2023 12:43 PM
views 106  views

सावंतवाडी : इन्सुली सावंतटेंब येथे माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याहस्ते ट्रांसफार्मरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोदी @९ चे हर घर मोदी कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी मंडल अध्यक्ष महेश धुरी, मधुकर देसाई , गुरुनाथ पेडणेकर, उपसरपंच कृष्णा सावंत, महेश धुरी ,मानसी धुरी, प्रविण देसाई ,शांताराम बंदिवडेकर, उमेश पेडणेकर आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.