
वेंगुर्ला: सिंधूरत्न समृद्ध योजनेअंतर्गत आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या वेंगुर्ले तालुक्यातील आडेली भंडारवाडी येथील ट्रान्सफॉर्मरचे उदघाटन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते फीत कापून व शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी पुढील काळात पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या भागात सर्व विकासकामे पूर्ण करण्याची ग्वाही दिली. यावेळी सरपंच यशस्वी कोंडस्कर, सामाजिक कार्यकर्ते तात्या कोंडस्कर, गजानन बांदिवडेकर, सिद्धेश टेमकर, बाबा टेमकर, न्हानू टेमकर, स्वप्नील नाईक, बाळू बोवलेकर, राजू खानोलकर, शशिकांत मांजरेकर, रूपेश सावंत, आबा नाईक, ठेकेदार श्री माईणकर आदी उपस्थित होते.