नाडण इथं सार्वजनिक शौचालय संकुलनाचे उद्घाटन !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 27, 2023 18:19 PM
views 177  views

देवगड : नाडण श्री महादेश्वर मंदीर येथे नविन सार्व. शौचालय संकुलनाचे उद्घाटन नाडण सरपंच संतोष कानडे यांच्या हस्ते झाले. नाडण येथील श्री .महादेश्वर मंदीर हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते या मंदीराची यात्रा अवघ्या दोन दिवसांवर आल्याने हा सार्व. शौचालय लवकर व्हावा यासाठी ग्रामपंचायतींने विशेष मेहनत घेऊन बांधकाम पुर्ण केले.

तसेच पंचायत समिती देवगड गटविकास अधिकारी जयप्रकाश परब याचे मार्गदर्शन तसेच प्रविण कानकेकर वैशाली मेस्त्री, विनायक धुरी यांनीही वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थांनी विशेषता महिलांनी समाधान व्यक्त केले . नाडण येथील या उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य श्रीम . नम्रता भिडे , एकनाथ पुजारे , ग्रामसेवक . उज्वल झरकर, मक्तेदार अक्षय तिळवे, ग्रामस्थ विश्वनाथ पुजारे , मकरंद जोशी, श्रीपत पुजारे , नितीन वारीक , चंद्रकांत पुजारे , सुभाष पुजारे , अतुल वेलणकर आदी मान्यवर उपस्थित होते . या उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, स्वागत व आभार ग्रामसेवक . उज्वल झरकर यांनी मानले .