
कणकवली : प्रधानमंत्री आवास योजनेच्या 13 घरांच्या संकुलाचे उद्घाटन सरपंच संदीप मेस्त्री यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कलमठ गावातील बेघर यादीतील लाभार्थ्यांना एकत्रित 13 घरांचे बांधकाम करून संकुल तयार करण्यात येत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. गावातील बेघर कुटुंबांना जमिन स्वतःच्या मालकीची नसल्याने घर बांधण्याची अडचण निर्माण होती .पण 'पंडित दिन दयाळ ' योजने अंतर्गत या सर्व बेघर आणि भूमिहीन लाभार्थ्यांना जमीन खरेदी साठी प्रस्ताव करण्यात आले असून सदर बेघर आणि भूमिहीन लाभार्थ्यांना शासनाच्या माध्यामातून अनुदान मिळवून देणार असल्याचे सरपंच संदीप मेस्त्री यानी सांगितले.
सर्व भूमिहीन घर मंजूर असलेल्या परंतु जमीन स्वताच्या मालकीची नसल्याने लाभार्थ्यांना तहसील कार्यालय कणकवली आणि ग्रामपंचायत माध्यमातून भूमिहीन दाखले मिळवून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि एकाच वेळी सर्वाना भूमिहीन दाखले उपलब्ध करून देण्यात आले.
भूमिहीन असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेतून जमीन खरेदी साठी अनुदान मिळवून देऊन संकुलासाठी 'पंडित दिन दयाळ उपाध्याय यांचे नाव देणार असल्याचे सरपंच संदीप मेस्त्री म्हणाले. एकाच दिवशी सर्व घरांचा गृहप्रवेश करून खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चाव्या देणार असल्याची माहिती मेस्त्री यानी दिली. सरपंच संदीप मेस्त्री यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत अधिकारी प्रविण कुडतरकर,माजी पंचायत समिती सदस्य महेश लाड, स्वप्निल चिंदरकर,अनुप वारांग, नितीन पवार,श्रेयस चिंदरकर, मिलिंद चिंदरकर, हेलन कांबळे, खुशाल कोरगावकर, गणेश सावंत, सचिन पोळ आणि सर्व लाभार्थी उपस्थित होते.










