कोळंब न्हिवेत वैभव नाईक यांच्या माध्यमातून उभारलेल्या सभामंडपाचं उदघाटन

Edited by:
Published on: February 27, 2025 13:45 PM
views 170  views

कुडाळ : कोळंब न्हिवे येथील श्री ब्राम्हणदेव मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा ३० वा. वर्धापन दिन सोहळा  मंगळवारी संपन्न झाला. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. या मंदिराच्या ठिकाणी  वैभव नाईक यांच्या माध्यमातून भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून या सभामंडपाचे वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करत आभार मानले. 

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शिवसेना प्रवक्ते मंदार केणी,माजी बांधकाम सभापती यतीन खोत, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, कोळंब उपसरपंच  विजय नेमळेकर, निखिल नेमळेकर, स्वप्नील परब, रोशन नेमळेकर, राकेश लाड, राजन दळवी, प्रथमेश लाड, श्रीपाद नेमळेकर, गुणेश गांगण, स्वप्नील दळवी, सुरेश लाड, अभय लाड, प्रतीक पाताडे, सिद्धेश पाताडे, भावेश पाताडे, गणेश परब, प्रथमेश परब, रवींद्र लाड, अंकुश कातवणकर, अभिमन्यू परब, संगम प्रभुगावकर कोळंब न्हिवे ग्रामस्थ मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते.