सावंतवाडीत ‘सुंदरवाडी चषक - २०२४ चा शुभारंभ

लेदर बॉल क्रिकेट स्‍पर्धा : एसएनआरआर ग्रुप सावंतवाडी आणि रोटरी क्‍लब ऑफ सावंतवाडीतर्फे आयोजन
Edited by:
Published on: February 24, 2024 14:26 PM
views 197  views

सावंतवाडी : एसएनआरआर ग्रुप सावंतवाडी आणि रोटरी क्‍लब ऑफ सावंतवाडी यांच्‍यावतीने आयोजित ‘सुंदरवाडी चषक-२०२४’ चा शुभारंभ माजी आमदार प्रविण भोसले यांच्‍या उपस्‍थितीत झाला. यापूर्वीएसएनआरआर ग्रुप सावंतवाडीच्‍या ज्‍येष्‍ठ खेळाडूंच्‍या उपस्‍थितीत द्रोणाचार्य पुरस्‍कार विजेते रमाकांत आचरेकर यांच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार अर्पण करत लेदर बॉल क्रिकेट स्‍पर्धेची सुरुवात करण्‍यात आली. ही स्‍पर्धा सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर खेळविण्‍यात येत आहे. 

२४ फेब्रुवारी रोजी या स्‍पर्धेस प्रारंभ झाला. यावेळी ज्‍येष्‍ठ खेळाडू बाबा खान, राजन नाईक, गुरूनाथ चोडणकर, राजा राणे, अनिल हळदीवे, दिलीप सांगावकर, शरद परब, नंदू रेडकर, आनंद आळवे, श्री. जाधव, दत्तात्रय कल्‍याणकर, संतोष केनवडेकर, रघुनाथ धारणकर, नॉबर्ट माडतीस, पत्रकार लक्ष्‍मण आडाव आदी उपस्थित होते. 

ही स्‍पर्धा १० मार्च २०२४ पर्यंत खेळवली जाणार आहे. प्रत्‍येक सामना २०-२० षटकांचा असणार आहे. या स्‍पर्धेत १६ संघानाच प्रथम प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. स्‍पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १,२५,००० व चषक, व्‍दितीय पारितोषिक ७५,००० व चषक तसेच वैयक्‍तीक बक्षिसांमध्‍ये मालिकावीर, उत्‍कृष्‍ट फलंदाज, उत्‍कृष्‍ट गोलंदाज, उत्‍कृष्‍ट यष्‍टीरक्षक, उत्‍कृष्‍ट  क्षेत्ररक्षक तसेच प्रत्‍येक सामन्‍यासाठी सामनावीर हा किताब देण्‍यात येणार आहे. जिल्‍ह्यातील रसिकांनी या स्‍पर्धा  पाहण्‍यासाठी उपस्‍थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.