आनंदराव पवार महाविद्यालयात क्रीडा विभागाचे उद्घाटन

नवागतांचा स्वागत सोहळा
Edited by: संदीप देसाई
Published on: July 06, 2024 07:06 AM
views 93  views

चिपळूण : श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे श्री. आनंदराव पवार महाविद्यालयात ४ जुलै २०२४ क्रीडा विभागाचे उद्घाटन व वरिष्ठ महाविद्यालयातील नवागत विद्यार्थ्याचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यानंतर वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मृणाल पवार यांनी शिक्षणाबरोबर खेळाचेही महत्व विद्यार्थ्यांच्या जीवनात अनन्य साधारण आहे. तसेच यातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी सुध्दा उपलब्ध आहेत असे आपले मत प्रास्ताविकेतून व्यक्त केले. नंतर संस्थेच्या कार्यध्यक्ष सौ. सई वरवाटकर, विश्वस्त डॉ. मीनल ओक, संचालक सुहास चव्हाण, विजय बागवे, विनोद फणसे परांजपे मोतवाले हायस्कूलचे पर्यवेक्षक शिवाजी शिंदे यांचे स्वागत वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मृणाल पवार यांनी पुष्प देऊन केले, तर संचालक मल्लेश लकेश्री, पी. आर. ओ. योगेश चोगले, रजिस्ट्रार अजित खेडेकर, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मृणाल पवार यांचे स्वागत पर्यवेक्षक शिवाजी शिंदे यांनी पुष्प देऊन केले.

संस्थेच्या कार्याध्यक्ष सई वरवाटकर यांनी नवीन प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयात शिक्षणाबरोबर शिस्त अन् संस्कार दिले जातात व त्याच बरोबर विविध उपक्रम सुध्दा राबविले जातात याबाबत माहिती दिली. तसेच रजिस्ट्रार प्रा. अजित खेडेकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग विद्यार्थ्यांसमोर सांगितले. आजची युवा पिढी ही देशाचा आधारस्तंभ आहे अशा पिढीला घडविण्याचे काम पालक आणि शिक्षक यांचे आहे असे देखील मत व्यक्त केले. तसेच आजच्या बदललेल्या शिक्षण प्रणाली बद्दल सुध्दा माहिती सांगितली. संस्थेच्या विश्वस्त डॉ. मीनल ओक यांनी सांगितले की इतिहासाची आठवण असणे खूप महत्त्वाचे आहे. मिळालेल्या संधीचा उपयोग करुन घेणे हे आजच्या पिढीला समजणे आवश्यक आहे तरच संधीचे सोने होण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले. यानंतर क्रीडा विभागाचे उद्घाटन संचालक विजय बागवे व डॉ. मीनल ओके यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मयुरी काटकर यांनी केले तर प्रास्ताविका प्रभारी प्राचार्या मृणाल पवार यांनी केली आणि शेवटी आभार प्रदर्शन प्रा. सविता शिरोळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी वर्ग आणि शिक्षकेतर, कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभून हा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.