तळकट धनगरवाडीतील सोलर स्ट्रीट लाईटचे लोकार्पण

Edited by: संदीप देसाई
Published on: October 01, 2023 18:46 PM
views 67  views

दोडामार्ग : तळकट धनगरवाडी येथे तीन  स्ट्रीटलाईट सोलर लॅम्प बसविण्यात आले असून त्याचे उद्घाटन तळकट ग्रामसेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष दीपक मळीक यांच्या हस्ते करण्यात आले. 

         धनगरवाडी रोडवर इलेक्ट्रिसिटीची लाईन नसल्यामुळे स्ट्रिट लाईट बसवण्यात आली नव्हती. त्यामुळे या रोडवर रात्रीच्या वेळी अंधार असायचा. त्यामुळे या ठिकाणी सोलर लॅम्प बसवण्याचा ग्रामपंचायतीने निर्णय घेतला.  या रोडवर तीन सोलर लॅम्प बसवण्यात आले आहेत. त्यामुळे धनगर वाडीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. 

    याउद्घाटनवेळी तळकट सरपंच सुरेंद्र सावंत - भोसले, उपसरपंच रमाकांत गवस, ग्रामपंचायत सदस्य पूर्वी सावंत, शशिकांत राऊळ, विवेक मळीक, माजी सरपंच धुरी , सोसायटी चेअरमन अंकुश वेटे, संचालक गोविंद देसाई, मुंबई मंडळाचे सदस्य लक्ष्मण सावंत, सिताराम सावंत, सदानंद राणे, तळकट ग्रामस्थ दुर्गाराम गवस, रमेश शिंदे, प्रसाद नाटेकर, सुरेश काळे, भरत सावंत, ग्रामपंचायत कर्मचारी बाळू देसाई, राजेश लांबर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते