
चिपळूण : शहरातील बहादूरशेखनाका रोटरी क्लब चिपळूण यांच्या पुढाकाराने तर आ. शेखर निकम यांच्या सहकार्याने निवारा शेड उभारण्यात आली असून या शेडचे नुकतेच आ. शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत झाल्याने प्रवाशांनी रोटरी क्लब, चिपळूण व आ. शेखर निकम यांना धन्यवाद दिले आहेत.
चिपळूण-बहादूरशेखनाका येथील निवारा शेडची दुरवस्था झाल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली. विशेषतः पावसाळा व उन्हाळ्यात प्रवाशांना मोठा त्रास होऊ लागला. यामुळे येथे निवारा शेडची जोरदार मागणी होऊ लागली. या विषयाकडे रोटरी क्लब, चिपळूण माजी अध्यक्ष बाळा आंबुर्ले व रोटेरियन यांनी २०२३-२०२४ या वर्षात या विषयाकडे लक्ष देऊन रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आ. शेखर निकम यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला. यानुसार आ. निकम यांच्या सहकार्याने बहादूरशेखनाका येथे निवारा शेड उभारण्यात आली.
या शेडचे नुकतेच उद्घाटन झाले. यावेळी चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, सुभाष मोहिते रोटेरीयन्स माजी अध्यक्ष बाळा आंबुर्ले, माजी सेक्रेटरी शैलेश टाकळे, माजी खजिनदार राजेश ओतारी, प्रोजेक्ट चेअरमन नितीन ठसाळे, रोटरी क्लब, चिपळूण विद्यमान अध्यक्ष अविनाश पालशेतकर, प्रसाद सागवेकर, वैभव रेडीज, शैलेंद्र सावंत, प्रकाश लटके, कपिल शिर्के, विनोद घुमरे, अक्षय कुडाळकर, नितीन देवळेकर, रोहन देवकर, बाबेश देवळेकर, अंकुश गांधी, दिनकर पवार, आसिफ पठाण, प्रदीप चिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश राणे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, युवक तालुकाध्यक्ष निलेश कदम, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष समीर काझी, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष सचिन साडविलकर आदी उपस्थित होते.