
वेंगुर्ला : रोझारिओ मित्रमंडळ उभादांडा यांच्या विद्यमाने व येथील ग्रामस्थ दानशूर व्यक्ती यांच्या सहकार्याने लोकसेवेसाठी घेण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा उद्या शनिवार दिनांक १० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता रोझारिओ चर्च उभादांडा सुकटनवाडी याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. तरी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन रोझारिओ मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.