नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून रस्त्याच्या कामाचे शुभारंभ

जनतेच्या वतीने नगरसेविका मेघा सावंत यांनी मानले आभार
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 13, 2023 17:20 PM
views 129  views

 कणकवली :  नगरसेविका मेघा सावंत यांच्या मागणीनुसार तसेच कणकवलीचे लोकप्रिय नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून टेंबवाडी ते राष्ट्रीय महामार्ग ६६ रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे त्याप्रमाणे टेंबवाडी रस्ता ते संतोष राणे घर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक मुंडले सर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रभागाच्या नगरसेविका मेघा सावंत, नगरसेवक अभी मुसळे, संतोष राणे, महेश सावंत, अभय राणे, विठ्ठल कांदळकर, अनिल राणे, संतोष सावंत, पेडणेकर मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

कणकवली शहराचे कार्यसम्राट नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून शहर विकासाचा झंझावत सुरुच....

नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या माध्यमातून टेंबवाडी आणि कांबळे गल्ली येथे कोट्यावधीचा निधी देऊन या प्रभागाचा सर्वांगीन विकास होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. विविध विकास कामे, रस्ते, स्पोर्ट्स कॉम्पलेक्स, गणपती साना, धबधबा अशी विविध विकासकामे करून माझा प्रभागाला नवीन ओळख निर्माण करून दिल्याबद्दल तसेच सर्व सुविधांनी परिपूर्ण केल्याबद्दल त्यांचे या प्रभागातील जनतेच्या वतीने नगरसेविका मेघा सावंत यांनी आभार व्यक्त केले.. यावेळी व्यंकटेश सावंत, धनंजय कसवणकर, सागर राणे, संदेश आर्डेकर, औदुंबर राणे, रुपेश साळुंखे, केतकर गुरुजी, आत्माराम राणे, बंडू राणे, धनंजय चव्हाण, गोट्या पारगावकर, आदर्श राणे, अविशित राणे, यश पालव, पाल, मकरंद राणे आदी ग्रामस्थ व जमीन मालक उपस्थित होते.