कणकवलीत R B CAKES & CAFE चे दिमाखात उद्घाटन...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 16, 2023 14:23 PM
views 579  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात केक आणि बेकरी मध्ये नावारूपास असलेल्या अरबी बेकरीची तिसरी शाखा बेक्स आणि कॅफेचे  उद्घाटन दिमाखात  कणकवली पटवर्धन चौक येथे  करण्यात आले. यावेळी बाळकृष्ण पोवाडन यांच्या हस्ते फीत कापण्यात आली व आमदार नितेश राणे व नीलम ताई राणे यांनी देखील या केक्स अँड कॅफे दुकानाला भेट देऊन पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

नेहमी ग्राहकांसाठी चांगल्या आणि दर्जेदार केक्स, बेकरी, कॅफे हाऊस, उपलब्ध व्हावे यासाठी प्रथमता रजित्रण कंटियन यांनी कणकवलीत प्रथम बेकरी अँड केक चालू केले त्यानंतर बेकरी अँड स्वीट चालू केले आता केक आणि कॅफेचे सुरुवात करून समस्त कणकवली वासियांना चांगले केक आणि कॅफे चॉकलेट आईस्क्रीम यासारखे खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले आहेत. कणकवलीकर देखील याला भरभरून प्रतिसाद देत आहेत. यावेळी, शिमी रजितत्रण कंटियन, रथिष कंडीयन, रोनिक रजित्रन, मुकुंद किनाती, भाऊ गावडे, समीर नलावडे राजू गव्हाणकर गौरव गव्हाणकर, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, गणेश तळगावकर, प्रसाद अंधारी राजू मानकर, विजय पारकर, हरीश उचले, प्रथमेश चव्हाण, अशोक पुजारी, सुशील पारकर, प्रद्युम मुंज, अनिकेत उचले, आदींनी भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.