
देवगड : देवगड तालुक्यातील हिंदळे ते मोर्वे या ठिकाणी वीज वाहिन्या भूमिगत करण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. नितेश राणे यांनी श्रीफळ वाढवून श्री गणेश मंदिर मोर्वे, हिंदळे ग्रामपंचायत ते मोर्वे ११ के. व्ही इलेक्ट्रिक केबल अंडरग्राउंड करणे या कामाचे भूमिपूजन केले आहे.यावेळी त्यांच्यासोबतप्रकाश राणे, भाई पारकर, सावी लोके, भाई नरे, गोविंद सावंत यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.किनारपट्टी भागातील विजेच्या समस्या सोडवणारा प्रकल्प म्हणून सर्व वीजवाहिन्या भूमिगत करण्याच्या करण्याचा प्रकल्प ओळखला जातो.