
दोडामार्ग : परमे पणतुर्ली ग्रामपंचायत कार्यालयाचा लोकार्पण सोहळा नुकताच तहसीलदार अमोल पवार व गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, सरपंच प्रथमेश मणेरीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच सपन्न झाला.
या वेळी ग्रामपंचायत कार्यालयासाठी मोफत जमीन उपलब्ध करून देणारे गावचे ग्रामस्थ श्रीराम गावडे व पांडुरंग गावडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सरपंच प्रथमेश मणेरीकर हे गाव विकासासाठी अतोनात मेहनत घेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत करिता सुसज्ज इमारतीच काम पुर्ण झालेंनंतर नुकताच मान्यवर यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला. सहा. यावेळी सहाय्यक बिडीओ यशवंत गवस, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी निलेश जाधव, lश्रीरंग जाधव, मंडळ अधिकारी शिरसाठ तसेच सरपंच प्रथमेश मणेरीकर उपसरपंच सॊ दिया गवस, ग्रामपंचायत सदस्य श्री सुनील गवस निच्छल परमेकर, बिंदिया बिर्जे सुचित्रा गवस, शैलेश बोर्डेकर, संजना सावंत, ग्रामपंचायत कर्मचारी शिवाजी सावंत, अपर्णा नाईक, स्वाती नाईक आणी परमे पंतुर्ली गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शाळेचे शिक्षक विशाल तायडे यांनी केले. यावेळी ग्रामस्थांनी प्रशासकीय अधिकारी यांच्या केलेल्या आगळ्या वेगळ्या स्वागतान भारावून गेले.