उभादांडा इथं नूतन शिवसेना शाखेचं मंत्री केसरकरांच्या हस्ते उदघाटन

Edited by: दिपेश परब
Published on: July 29, 2024 09:22 AM
views 210  views

वेंगुर्ला : तालुक्यातील उभादांडा येथे स्थापन करण्यात आलेल्या नूतन शिवसेना शाखेचे उदघाटन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, या उभादांडा गावाला फार मोठे भवितव्य पर्यटनाच्या दृष्टीने आहे. याठिकाणी एटीडीसीचा एक मोठा प्रकल्प आम्ही मंजूर केला आहे, त्याचे काम प्रगतीपथावर आहे. पाहिलं कवितांच गाव हे उभादांडाला दिलेले आहे, यातील एका दालनाचे उदघाटन झाले असून उर्वरित चार दलनांची उदघाटने लवकरच होणार आहेत. पुढील काळात अनेक चांगल्या सुविधा या गावात होत असताना फिशिंग व्हिलेज हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प सुद्धा याठिकाणी होणार आहे, नुकतेच त्यासाठी साडेतीन कोटी रुपये मंजूर केलेले आहे. 

मच्छिमारांचा थेट संबंध हा मासेमारीशी येतो. ज्यावेळी समुद्रात मासे कमी मिळतात तेव्हा आपण मत्स्यशेती करतो. म्हणून मत्सशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी मल्टी फीशेस हॅचरी हा प्रकल्प सुद्धा उभादांडा व सागरतीर्थ येथे मंजूर करण्यात आला आहे. यामुळे हे सर्व प्रकल्प लवकरच ज्यावेळी सुरू होतील त्यावेळी उभादांडा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ होईल आणि त्याचा फायदा याठिकाणचे युवक, महिलांना होईल. असे प्रतिपादन यावेळी मंत्री केसरकर यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, विभाग प्रमुख नयन पेडणेकर, मच्छिमारसेल तालुकाप्रमुख गणपत केळुसकर, तुळस विभाग प्रमुख संजय परब, खानोली उपसरपंच सचिन परब, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्निल गावडे, युवासेना शहरप्रमुख संतोष परब, महिला शहर संघटिका श्रद्धा परब- बाविस्कर, शबाना शेख, प्रकाश मोटे, विठोबा तांडेल, प्रशांत नार्वेकर, उदय गावडे, सॅमसन फर्नांडिस, विनय डिचोलकर, अनुप नार्वेकर, संजय गावडे, शिवाजी पडवळ, राजू परब, प्रभाकर पडते आदी उपस्थित होते.