तळेरेत NEMS स्मार्ट किड्स प्री - प्रायमरी स्कूलचं उद्या उद्घाटन..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 06, 2023 18:37 PM
views 162  views

कणकवली : सिंधुदुर्गात प्रचलित आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीअम स्कूल नडगिवे खारेपाटणशी संलग्न असलेल्या तळेरे येथील NEMS  स्मार्ट किड्स प्री - प्रायमरी स्कूलचे उद्घाटन प्रख्यात बालनाट्य कलाकार फेम प्रवीणकुमार भारदे यांच्या हस्ते होणार असून त्यांनी आतापर्यंत बालनाट्याचे दोन हजार पेक्षा जास्त प्रयोग केले आहेत.  

उद्या ७ जुलै रोजी दुपारी 3 वाजता  प्रवीणकुमार भारदे  व  नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष  मनोज गुळेकर यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन कार्यक्रम होणार असून यावेळी संस्था समन्वयक पराग शंकरदास, संचालक मोहन कावळे,अॅड. सागर तळेकर, रघुवीर राणे, राजेंद्र ब्रम्हदंडे तसेच परवेझ  पटेल व मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई व शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. तरी मुलांनी व पालक वर्गाने बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आव्हान प्रशालेच्या वतीने करण्यात येत आहे.