माजगावात जादुगार कार्यक्रमाचं विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन

Edited by: भरत केसरकर
Published on: October 21, 2023 14:21 PM
views 138  views

सावंतवाडी : जगाने पाहावा असा जुबिल नौटियालचा कार्यक्रम सावंतवाडीकरांनी पाहिला. खर तर मला ही गर्दी बघून प्रचंड आनंद झाला होता. मला गर्दीची हौस नाही. परंतु त्या कार्यक्रमाला  जिल्हातील लोकांनी केलेली गर्दी बघून मी भारावून गेलो. आज मी माजगाव मध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो आहे. भविष्यात असे कार्यक्रम या मंडळांनी घ्यावेत. यासाठी आपलं संपूर्ण सहकार्याला आहे. अशी प्रतिक्रिया भाजपचे युवा नेते विशाल परब देत संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ माजगाव नाला यांच्यावतीने आयोजित जादूगार कार्यक्रमाचे उद्घाटन करताना विशाल परब बोलत होते.

यावेळी त्यांनी या मंडळाच्या नवरात्र उत्सावास भेट देत देवीचे दर्शन घेतले. माजगाववासियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विशाल परब यांचा शाल श्रीफळ देवून मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.