
कणकवली : महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जानवली भूमीत 'लुंबिनीवन बुद्ध विहार' बांधण्यात आले आहे. विहाराचा उदघाटन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त भारतीय बौद्ध महासभा जानवली शाखा, बौद्ध विकास संघ मुंबई व ग्रामीण शाखेच्यावतीने १५ ते १६ मे या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे उदघाटन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा कमांडर इनकी सैनिक दलाचे डाॅ. भिमराव यशवंतराव आंबडेकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी जानवली बौद्ध विकास संघ, मुंबईचे अध्यक्ष सुनील पवार हे असून स्वागताध्यक्ष जानवलीचे सरपंच अजित पवार हे असणार आहेत.
गुरुवार १५ मे रोजी सकाळी ९ वा. बुद्ध मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक कणकवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून तेथून कणकवली बुद्ध विहार ते लुंबिनीवन बुध्दविहारापर्यंत कढण्यात येणार आहे, १० वा. डॉ. भिमराव आंबेडकर यांच्या आगमन होईल. त्यानंतर त्यांना समता सैनिक दलाकडून मानवंदना देण्यात येईल. डॉ. भिमरावआंबेडकर यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण आणि लुंबिनीवन बुध्द विहाराचे उद्घाटन व लोकार्पण होईल. त्यानंतर लुंबिनीवन बुध्द विहारातील बुद्ध मूर्ती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची भंतेजींकडून विधीवत पुजापाठ आणि मूर्ती प्रतिष्ठापना होईल. १०.३० वा. डॉ. भिमराव आंबेडकर यांच्या हस्ते व कोनशीला व नामफलकाचे अनावरण होईल. १०.४५ वा. भारतीय बौध्द महासभा महिला गावशाखा जानवली यांच्या गायन होईल. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत होणार आहे. ११.४५ वा. पू. भंतेगण आणि भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा आयोजित बालश्रामणेर शिबिराचा समारोप समारंभ, दुपारी १२ वा. डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर यांचे मार्गदर्शन, १ वा. स्नेहभोजन, दुपारी ३ वा. पूज्यनीय भंते गणांची जनसमुदायास धम्मदेसना, सायं. ४.३० वा. चहापान व महिला स्नेहसंमेलन कार्यक्रम (मुंबई व ग्रामीण), सायं. ७ वा. लहान मुले व युवक-युवतींचे महिला व पुरुष यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
शुक्रवारी १६ मे रोजी सकाळी ९ वा. बुद्ध वंदना, पूजा पाठ, सूत्रपठण, १० वा. जानवली बौध्द विकास संघ, मुंबई व ग्रामीणच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि सदस्यांचा सत्कार, ११ वा. पंचशील धम्म ध्वजारोहण, मानवंदना, सायं. ५ वा. गुणवंत विद्याथर्यांचा सत्कार व गुणगौरव, सायं. ७ वा. मुला-मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम, ८.३० वा. जिल्हास्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा, आभार प्रदर्शन व समारोप होईल. या कार्यक्रमांना भारतीय बौद्ध महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, पोलीस पाटील पांडुरंग राणे, भारतीय बौद्ध महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्ष सुषमा हरकुळकर, उपसपंच किशोर राणे, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी भाई जाधव, पोलीस पाटील मोहन सावंत, भारतीय बौद्ध महासभेच्या कणकवली शाखेच्या महिला तालुकाध्यक्ष आशा भोसले, स्टेट बाॅफ आॅफ इंडियाचे चीप मॅनेजर धनाजी जाधव यांची प्रमुख उपस्थित असणार आहे. तरी बौद्ध बांधवांनी या कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.