'कसब २०२४' चे २० एप्रिलला उद्घाटन

Edited by: विनायक गांवस
Published on: April 18, 2024 14:23 PM
views 124  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथील डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी, फाउंडेशन कोर्स इन आर्टचे वार्षिक कलाप्रदर्शन 'कसब २०२४' चे उद्घाटन २० एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता होणार असून  २० एप्रिल व २१ एप्रिल २०२४ या कालावधीत सर्व कलारसिकांसाठी खुले राहील. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी जाहिरात व कलाक्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेले काम पाहण्याची संधी कलारसिकांना प्राप्त होत आहे.  या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्याचे माहिती अधिकारी सतिश पाटणकर यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी कलाशिक्षक राजेश आजगावकर, तसेच संस्थेचे पदाधिकारी गोविंद बांदेकर, अनुराधा बांदेकर, गिता बांदेकर, तुकाराम मोरजकर आदी उपस्थित राहणार आहेत.सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी तर्फे करण्यात आले आहे.