
कणकवली : कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय नूतन इमारतीचे उद्घाटन आ.नितेश राणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी आ.नितेश राणे यांनी उर्वरित इमारतीसाठी १० लाखांचा निधी जाहीर केला आहे. कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय नूतन इमारतीचे उद्घाटन निमित्त गणेश पूजन,ग्रंथदिंडी काढण्यात आलीयावेळी अशोक बागवे, ज्येष्ठ कवी ,नाटककार प्रदीप ढवळ,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना संदेश सावंत, सांगवे सरपंच संजय सावंत, आणि पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच उपास्थित होते. यावेळी युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित निबंध, हस्ताक्षर व वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. बहुसंख्येने शिक्षक व विद्यार्थी व शिक्षण प्रेमी यांनी उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर आमदार निरंजन डावखरे यांनी वाचनालयाला भेट देत शूभेच्छा दिल्या.या वाचनालयाच्या इमारतीसाठी आमदार निरंजन डावखरे यांनी आपल्या फंडातून १० लाख व आमदार नितेश राणे यांनी आपल्या आजीच्या स्मरणार्थ स्वखर्चाने ३ लाखाचे फर्निचर आणि अंतर्गत सुशोभीकरण करुन दिले आहे. त्याबद्दल दोन्ही आमदारांचा वाचनालयाच्या संचालक मंडळाकडून शाल, श्रीफळ ग्रंथ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी मनोगतात लवकरच वाचनालय मार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. ई वाचनालया मार्फत मुलांना अद्ययावत माहिती पुरविण्यात येईल,असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष मोहन सावंत यांनी केले.