पत्रकार संघ कक्षाचा शुभारंभ..!

Edited by: विनायक गावस
Published on: March 12, 2024 09:24 AM
views 95  views

सावंतवाडी : सावंतवाडीच्या विकासात पत्रकारांचे खूप मोठ योगदान आहे. त्यांच्यासाठी हक्काचा कक्ष असावा यासाठी मी नगराध्यक्ष असताना हा कक्ष नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आला होता. नुकतंच त्याच नुतनीकरण करण्यात आलं असून आज त्याचा शुभारंभ करण्यात आला. आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा जपणाऱ्या पत्रकारांसाठी हा कक्ष खुला करण्यात आला आहे‌. पत्रकार संघाच्या कार्याला आपला नेहमीच पाठिंबा राहिला आहे असे मत शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. नगरपरिषद येथील पत्रकार संघ कक्षाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या इमारतीतील पत्रकार कक्षाचा शुभारंभ करण्यात आला. नुकताच या कक्षाच नुतनीकरण करण्यात आले आहे. आजपासून हा कक्ष पत्रकारांसाठी खुला करण्यात आला आहे. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, नगरपरिषदेत हा कक्ष स्थापन झाला त्यावेळी मी नगराध्यक्ष होतो. सावंतवाडीच्या विकासात पत्रकारांचे खूप मोठ योगदान आहे. विकासासाठी नेहमीच चांगल्या सुचना पत्रकारांकडून व्हायच्या. त्यामुळे अधिक चांगल काम करता आले. समाजात विधायक काहीतरी घडावे यासाठी पत्रकार नेहमी अग्रेसर असतात. त्यामुळे अर्थ राज्यमंत्री असताना सिंधुदुर्गनगरीतील पत्रकार भवनासाठी तत्कालीन जिल्हाध्यक्ष गजानन नाईक व सहकारी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ते होऊ शकले. आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे खऱ्या अर्थाने स्मारक उभारता आले याचे समाधान आहे असे मत मंत्री केसरकर यांनी यावेळी व्यक्त केले. तर यावेळी स्वखर्चातून या पत्रकार कक्षासाठी एअर कंडिशन बसवणार असल्याचे नामदार केसरकर यांनी सांगितले.

यावेळी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रविण मांजरेकर यांनी पत्रकारांच्या उपक्रमांना साथ देणाऱ्या शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना शुभेच्छा दिल्या. तालुका पत्रकार संघाच्यावतीने सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या हस्ते दीपक केसरकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंते यांचाही सत्कार करण्यात आला. आभार व्यक्त करताना तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व नगरपरिषद प्रशासनाचे धन्यवाद व्यक्त केले. पत्रकार संघाच्या उपक्रमासाठी नेहमी असेच सहकार्य द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी मुख्याधिकारी सागर साळुंखे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंते, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार,मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, सोशल मीडिया संपादक संघाचे अध्यक्ष सीताराम गावडे,डिजिटल मिडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, संतोष सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी,  शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, माजी अध्यक्ष प्रविण मांजरेकर, सचिव मयुर चराठकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, उपाध्यक्ष काका भिसे, दीपक गांवकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, रूपेश पाटील,रमेश बोंद्रे, सचिन रेडकर, मोहन जाधव राजेश नाईक, रूपेश हिराप, उमेश सावंत, विनायक गांवस, शैलेश मयेकर, प्रा. रूपेश पाटील, संतोष सावंत, मोहन जाधव, प्रसन्न गोंदावळे, जतिन भिसे, दिव्या वायंगणकर, अनुजा कुडतरकर, नितेश देसाई, भुवन नाईक आदी पत्रकार उपस्थित होते.